पिस्तुलसह ठेवलेले व्हिडिओचे ‘स्टेटस’ भोवले; दोन भावांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:53 PM2021-07-28T17:53:30+5:302021-07-28T17:54:26+5:30
गुंडा विरोधी पथकाची आकुर्डीत कारवाई
पिंपरी : पिस्तूलसह व्हिडिओ तयार करून तो व्हाटसअपवर स्टेटस ठेवणे दोन सख्ख्या भावांना भोवले आहे. दोन्ही भावांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल व एक दुचाकी जप्त केली. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकातील पोलिसांनी आकुर्डी येथे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.
आरशान शाकीर शेख (वय २५) आणि उमेश जाकीर शेख (वय २१, दोघेही रा. हसनपापा चाळ, दत्तवाडी, आकुर्डी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुंडाविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी गावठी बनावटीच्या पिस्तूलासह व्हिडिओ तयार करून तसेच पिस्तुलासह असलेले फोटो व्हाटसअपवर स्टेटस म्हणून व्हायरल केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गंडा विरोधी पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी पिस्तूल व दुचाकी जप्त केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.