स्टिंग ऑपरेशन - उद्योगनगरीत राजरोसपणे बेकायदा गॅस रिफिलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:35 PM2019-04-26T13:35:56+5:302019-04-26T13:42:46+5:30
गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
मंगेश पांडे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या राजरोसपणे अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंगचा उद्योग सुरू आहे. यातून मोठ्या दुर्घटना घडत असतानाही हे रॅकेट चालविणाऱ्यांवर परिमंडळ कार्यालयाकडून कठोर कारवाई होताना दिसत नाही. केवळ कधीतरीच एखाद्या दुकानावर कारवाई करून फार्स केला जातो. अशाप्रकारे बेकायदारीत्या उद्योग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही धोकादायक पद्धतीने हा उद्योग केला जात आहे. चिखली, कुदळवाडी, भोसरी, पिंपरी, रहाटणी, निगडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड आदी भागांत अशाप्रकारे सर्रासपणे गॅस रिफिलिंग केले जाते. मात्र, परिमंडळ कार्यालयाच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष केल्
..........
* दुरुस्तीच्या नावाखाळी रिफिलिंग, एक हजाराकरिता जीव धोक्यात
अनेकजण अधिकृत गॅस वितरकाकडून घरगुती वापराचा १४ किलो २००ग्रॅमचा गॅस सिलिंडर घेत नाहीत. केवळ पाच किलो गॅस मावेल या आकाराचे रिकामे सिलिंडर घेतले जातात. या सिलिंडरमध्ये गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानांसह भांड्याच्या दुकानांमध्ये बेकायदारीत्या गॅस भरून दिला जात आहे. गॅस रिफिलिंग रॅकेट चालविणारे त्यांना या छोट्या आकाराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. या बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्रांवर अत्यंत ज्वलनशील असलेला गॅस धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये भरला जातो. एक प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार सध्या शहरात सुरू आहे.
.........
गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांकडून नऊशे ते एक हजार रुपयांना गॅस सिलिंडर घेतला जातो. त्यानंतर दीडशे रुपये किलोप्रमाणे छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदारीत्या गॅस भरून देतात. त्यामुळे त्यास १४ किलोच्या गॅसमधून प्रतिकिलो दीडशे रुपयांप्रमाणे गॅसची विक्री
केल्यास २ हजार १०० रुपये मिळतात. हे जादा पैसे मिळविण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालून हा उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे.
....
शहरात स्फोटाच्या तीन घटना
चिखली येथे अडीच वर्षांपूर्वी अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करीत असताना स्फोट झाला होता. यामध्ये सिलिंडर उंच हवेत उडून डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या वेळी लागलेल्या आगीत आजूबाजूच्या दुकानांचेही नुकसान झाले. यासह ९ एप्रिल २०१९ ला देखील वाकड रोड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी येथील एका दुकानात गॅॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडून त्या दुकानासोबतच बाजूला असणाऱ्या झोपड्यांना आग लागली.