वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 05:46 PM2018-09-17T17:46:36+5:302018-09-17T17:48:29+5:30

वर्गणी दिली नाही म्हणून निगडीत टाेळक्यांनी दुकानावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे.

stone pelting on shop for not giving donation for ganeshotsav | वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार

वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार

Next

पिंपरी :  निगडी यमुनानगर येथील एका किराणा मालाच्या दुकानदाराने गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून सात ते आठ जणांच्या टोळक्यांने शिवीगाळ करत दुकानावर दगडफेक केली. ही घटना  रविवारी रात्री दहाच्या सुमारास यमुनानगर येथे घडली.   
    
    या प्रकरणी दुकान मालक रमेश आर. जलोट (वय ३३, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकानाचे मालक रमेश जलोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी टोळके आले.  त्यांनी दोन हजार रुपयांची वर्गणी द्यावी, असा तगादा लावला. मात्र, मालक आल्यावर या किंवा त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या, असे दुकानातील कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी दुकानाच्या काऊंटरची तोडफोड केली व तिथून पळ काढला.

     याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: stone pelting on shop for not giving donation for ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.