‘त्या’ बांधकामावरील कारवाई थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:44 AM2017-08-03T02:44:23+5:302017-08-03T02:44:23+5:30

रिंगरोडबाधित आणि प्राधिकरण आरक्षित बांधकामांवर कारवाई तुर्तास थांबवण्यात यावी, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्याकडे करण्यात आली आहे.

Stop the action on 'those' constructions | ‘त्या’ बांधकामावरील कारवाई थांबवावी

‘त्या’ बांधकामावरील कारवाई थांबवावी

Next

रावेत : रिंगरोडबाधित आणि प्राधिकरण आरक्षित बांधकामांवर कारवाई तुर्तास थांबवण्यात यावी, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्याकडे करण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या महत्त्वकांक्षी रिंगरोड प्रकल्पामध्ये वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव येथील हजारो घरांसह अनेक दुकाने बाधित होणार असून संबंधित प्रकल्पाला बाधित नागरिकांकडून विविध प्रकारच्या आंदोलनातून मागील ४५ दिवसांपासून तीव्र विरोध होत आहे.
या वेळी थेरगाव सघर्ष समितीचे बजरंग पवार, विशाल पवार, रवींद्र पवार, मयूर पवार, योगेश ईरोळे, धनाजी येळकर आदी उपस्थित होते.
प्राधिकरणाच्या वतीने रिंगरोडबाधितांवर होणारी कारवाई थांबवावी या मागणीचे निवेदन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देताना संघर्ष समितीचे पदाधिकारी़

Web Title: Stop the action on 'those' constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.