विद्यार्थिनीला मिळाले जीवनदान

By admin | Published: December 27, 2016 03:13 AM2016-12-27T03:13:24+5:302016-12-27T03:13:24+5:30

महापालिका शाळेत शिकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थिनीची हृदय शस्त्रक्रिया पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि वर्गशिक्षिकेच्या प्रयत्नामुळे मोफत करणे शक्य झाले.

Student gets life card | विद्यार्थिनीला मिळाले जीवनदान

विद्यार्थिनीला मिळाले जीवनदान

Next

पिंपरी : महापालिका शाळेत शिकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थिनीची हृदय शस्त्रक्रिया पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि वर्गशिक्षिकेच्या प्रयत्नामुळे मोफत करणे शक्य झाले.
चिंचवड स्टेशन येथील महापालिकेच्या कन्याशाळेतील इयत्ता पाचवी अच्या वर्गशिक्षिका सविता गावडे यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी वैष्णवी धोत्रे या विद्यार्थ्यांच्या हृदयास होल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांनी शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा सल्ला देताना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी साधारण दीड लाख रु. खर्च येणार असल्याचे सांगितले. वैष्णवी ही इंदिरानगर चिंचवड स्टेशन झोपडपट्टीत राहते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई अशिक्षित व धुण्या-भांड्याची कामं करते. अशात गावडे यांनी वैष्णवीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रवीण जाधवर, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे, तानाजी कुकनर , विजया सोनटक्के यांच्या सहकार्याने हृदयशस्त्रक्रियेसाठी असलेल्या विविध शासकीय योजना- प्रधानमंत्री योजना, राजीव गांधी योजना व निधी उपलब्ध
करून देणाऱ्या विविध ट्रस्ट-शिर्डी साईबाबा ट्रस्ट, एलआयसी ट्रस्ट, महापौर फंड, हॉस्पिटलची माहिती घेतली.
पदवीधर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षिका गावडे यांच्या प्रयत्नामुळे वैष्णवीला
एक प्रकारे जीवनदान मिळाले
आहे. (प्रतिनिधी)

- सविता गावडे यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली. स्वत: तहसील कार्यालयात जाऊन वैष्णवीच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला मिळवला. सातत्याने वैष्णवीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटल, डॉक्टरांशी संपर्क ठेवला. वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने व हॉस्पिटल आवश्यक तो प्रतिसाद देत नसल्याने वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी मराठे व गावडे भांडलेही. अखेर कोरेगाव पार्क पुणे येथील बुधरानी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर रोजी वैष्णवीच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Web Title: Student gets life card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.