पालिका शाळेत विद्यार्थ्यांची गळती
By admin | Published: November 18, 2016 04:55 AM2016-11-18T04:55:07+5:302016-11-18T04:55:07+5:30
शाळांची स्वच्छता ही मुलांच्या शिक्षणाची मूलभूत गरज आहे. शासनाच्या विविध योजनामधून शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च
पिंपळे गुरव : शाळांची स्वच्छता ही मुलांच्या शिक्षणाची मूलभूत गरज आहे. शासनाच्या विविध योजनामधून शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही शाळांमध्ये स्वच्छतेचा अभाव, खेळाची अत्यल्प मैदाने, रखडलेली कामे आदींच्या समस्येने घेरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्येचा आलेख दर वर्षी कमी होत चालला आहे.
माध्यमिक विद्यालय, पिंपळे गुरव - ५वी ते १०वीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या विद्यालयात इमारतीच्या पाठीमागील बाजूस उच्च दाबाच्या वीजतारा उघड्या आहेत. त्यामुळे या उच्च वीजतारांचा मुलांना धोका निर्माण होऊन एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मुलींच्या स्वच्छतागृहाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. उपलब्ध निधी नसल्याने काम संथ गतीने अंतिम टप्प्यात आहे.
श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप माध्यमिक शाळा, वैदूवस्ती - शाळा क्र. ५८-१, मुलांची, तर ५८-२ मुलींची शाळा आहे. वैदूवस्तीतील शाळेच्या मैदान दुरुस्तीच्या समस्या प्रशासनाकडे मांडल्या आहेत.
या शाळेमध्ये वैदू समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा, जुनी सांगवी - मुला-मुलींची शाळा क्र. ४९, ५० या शाळेसाठी तीन मजली इमारत आहे.
मात्र, विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात आहे. दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेमध्ये मैदान, स्वच्छतागृह आदी समस्या प्रलंबित आहेत. यासाठी मुख्याध्यापकाने लक्ष घालण्याची मागणी पालवर्गाकडून होत आहे. शाळा सुटल्यानंतर व शाळा भरण्यापूर्वी गर्दी हटविण्यासाठी शाळेने त्या ठिकाणी सेवक वर्ग नेमावा, म्हणजे कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. (वार्ताहर)