पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:03 PM2018-08-25T16:03:01+5:302018-08-25T16:05:13+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले.
पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले.थेरगाव येथील प्रज्ञा माध्यमिक विदयालयाच्या वतीने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वाकड पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सुंदर रांगोळी काढली होती. राखी बांधण्यामध्ये वैष्णवी साळवे, पल्लवी मिसळे, स्वाती गरडे, मनाली भालेराव, कार्ति साळवे, काजल चव्हाण,राणी गोडाबे, वैशाली राठोड, वर्षा फुलावळे, पुनम कदम, देवतीन गायकवाड, कांचन साळवे ,गौरी कांबळे, सपना पवार या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन, सहायक निरीक्षक तानाजी भोगम, उपनिरीक्षक रमेश केंगार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व संस्थेचे खजिनदार बुध्दभुषण गवळी उपस्थितीत होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सहशिक्षिका मंगला सपकाळे,चंद्रकला काळोखे, संगिता रोकडे, प्रज्ञा सोनवणे यांनी नियोजन केले. राखी बाधल्यानंतर पोलीस काकानी सर्व विद्यार्थिनींना भेट म्हणून खाऊचे वाटप केले.