स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; विविध पदांची भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

By admin | Published: October 17, 2016 04:26 PM2016-10-17T16:26:19+5:302016-10-17T18:30:51+5:30

राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Students' rage of competition exams; Opposition against the recruitment of various posts | स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; विविध पदांची भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; विविध पदांची भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ : राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातीच काढल्या गेल्या नाहीत.परिणामी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एमपीएससी स्टुडेंटस् राईटच्या माध्यमातून 400 हून अधिक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी शनिवारवाडा ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.
राज्य शासनाने नोकर भरती वरील कपात त्वरीत उठवावी, राज्यसेवा,विक्रीकर निरीक्षक, वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात.

शासनाच्या कंत्राटी पध्दतीने भरल्या जाणार व सध्या भरण्यात आलेल्या सर्व जागा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भराव्यात. पीएसआय पदाची 2 वर्षे न काढलेली जाहिरात त्वरीत काढावी.1998 पासून बंद झालेली एक्साईस इन्सपेक्टर पदाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. कृषी सेवकाच्या परीक्षेमध्ये झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून त्यावर कार्यवाही करावी,आदी प्रमुख मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊन आपला आक्रोश व्यक्त केला.

आमचा मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात नाही तर विविध पदांच्या भरतीविषयी शासनाने स्वीकरलेल्या धोरणाविरोधत आहे,असे मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तब्बल 25 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रोफाईल तयार झाले आहे. मात्र, त्यातुलनेत विविध पदांची भरती करण्यासाठी एमपीएससीकडून जाहीराती काढल्या जात नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. पूनम डोके,कुमुदिनी पातोडे, राणी डफळ, प्रियदर्शनी पाटील आदी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांशी संवाद साधला.

 

Web Title: Students' rage of competition exams; Opposition against the recruitment of various posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.