विद्यार्थ्यांना शिपायामार्फत पाठविले घरी; थकबाकी, प्रवेशप्रक्रिया पूर्ण नसल्याचा शाळेचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:00 AM2017-08-04T03:00:59+5:302017-08-04T03:00:59+5:30

मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेने दोन विद्यार्थ्यांना शिपायामार्फत घरी पाठविण्याचा प्रकार घडल्याची तक्रार एका पालकाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे केली आहे.

 The students sent home by the soldier; Pending, the school claims that the entry process is not complete, the Lokmat News Network | विद्यार्थ्यांना शिपायामार्फत पाठविले घरी; थकबाकी, प्रवेशप्रक्रिया पूर्ण नसल्याचा शाळेचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांना शिपायामार्फत पाठविले घरी; थकबाकी, प्रवेशप्रक्रिया पूर्ण नसल्याचा शाळेचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क

Next

किवळे : मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेने दोन विद्यार्थ्यांना शिपायामार्फत घरी पाठविण्याचा प्रकार घडल्याची तक्रार एका पालकाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे केली आहे. मात्र, संबंधित पालकाने एका पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नसून, दुसºया पाल्याची शाळेची थकबाकी भरलेली नाही. शाळा सोडल्याचा दाखला पाठविल्यानंतर तो न स्वीकारता पाल्यांना शाळेत पाठवीत असल्याने शिपायामार्फत संबंधित विद्यार्थ्यांना घरी सोडल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
मेहरबान सिंग तक्की (रा. देहूरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नमनप्रीत कौर (इयत्ता दुसरी), व सरबजितसिंग तक्की (इयत्ता पहिली) ही दोन मुले लायन्स क्लबच्या शाळेत शिकत असून संबंधित विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेत बसण्याबाबत मनाई करण्यात येत होती. मात्र, संस्थेच्या एका विश्वस्ताने मध्यस्थी केल्यानंतर तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार एक दिवस शाळेत बसून दिले. मात्र, गुरुवारी पुन्हा शाळेने त्यांच्या एका शिपायामार्फत दोन्ही मुलांना घरी पाठविण्यात आल्याची तक्रार केली असून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे म्हटले आहे.

Web Title:  The students sent home by the soldier; Pending, the school claims that the entry process is not complete, the Lokmat News Network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.