विद्यार्थ्यांना जुंपले प्रचाराला
By Admin | Published: February 17, 2017 04:46 AM2017-02-17T04:46:36+5:302017-02-17T04:46:36+5:30
महापालिका निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढला असून, उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचारासाठी पूर्वी फुकटात
निगडी : महापालिका निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढला असून, उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचारासाठी पूर्वी फुकटात कार्यकर्ते मिळायचे. परंतु आता राबणाऱ्या कार्यकर्त्यांचीच वानवा असल्याने प्रचारासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खर्च करावा लागतो आहे. शहरातील प्रचारासाठी विद्यार्थ्यांना पैशाचे आमिष दाखवून राबवून घेतले जात आहे.
शहरात बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असल्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना प्रचारासाठी राबविले जात आहे. सुशिक्षित आणि शिकलेला तरुण वर्ग प्रचारासाठी फायदेशीर ठरत आहे. साधारण एका दिवसासाठी पाचशे रुपये विद्यार्थ्यांना दिले जाते.
गाडी असल्यास पेट्रोल आणि दोन वेळेचे जेवण दिले जाते. विद्यार्थ्यांना गटागटाने प्रभागात प्रचारपत्रकांचे वाटप करण्यासाठी पाठविण्यात येते.
मतदारांना उमेदवारांना
माहिती देण्यासाठी सुशिक्षित कार्यकर्ता या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळत असल्याने उमेदवारही खूष आहेत.
मार्चमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. तरीही दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मिळत असल्याने अनेक विद्यार्थी प्रचारासाठी जात आहेत. (वार्ताहर)