विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Published: June 11, 2017 03:50 AM2017-06-11T03:50:40+5:302017-06-11T03:50:40+5:30
बोपखेलमध्ये एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आत्महत्येमागील
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : बोपखेलमध्ये एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही. महेश नागेंद्र शेट्टी (वय १६, रा. बाराथेवस्ती, पंचशीलनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शुक्रवारी सांयकाळी त्याच्या घराच्या वरच्या खोलीत झोपला होता. आजी त्याच खोलीत होती, मात्र ती काही कामानिमित्त खाली आली.
- महेशने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्या खोलीत आत्महत्या केली. घटना घडली त्या वेळी घरात महेशचे आई-वडीलदेखील होते. महेश खडकी येथील एस.ई.ई़ या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.