राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात
By रोशन मोरे | Published: November 6, 2023 04:54 PM2023-11-06T16:54:05+5:302023-11-06T16:54:26+5:30
ट्रेकींगमुळे झालेल्या त्रासामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी स्कूल जवळ गर्दी करत सुट्टी देण्याची मागणी केली
पिंपरी : ट्रेकिंगला गेलेल्या सात विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ट्रेकींगमध्ये डिहायड्रेशनमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे बिझनेस स्कुल तसेच पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.४) इन्ड्स बिझनेस स्कूलकडून ३५० विद्यार्थ्यांना ट्रेकींगसाठी लोणावळ्या जवळील राजमाची येथे नेण्यात आले होते. ट्रेकींगला जावून आल्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. ट्रेकींगमुळे झालेल्या त्रासामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी स्कूल जवळ गर्दी करत सुट्टी देण्याची मागणी केली.
कॉलेजच्या आवारात गर्दी झाल्याचा कॉल आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन तेथे पाहणी केली आणि माहिती घेतली. ट्रेकींगला गेलेल्या सात विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केल्याचे समजले. कॉलेज प्रशासन तसेच विद्यार्थी यांनी एकमेकांच्या विरोधात काहीच तक्रार नसल्याचे सांगितले. - श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी