‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:04 AM2019-02-19T01:04:53+5:302019-02-19T01:05:20+5:30

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : पोलीस आयुक्तांची घेतली भेट

Submit the complaint to the 'Engineer', demand of all-party corporators | ‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेतील अभियंता अनिल राऊत यांनी शिवसेना गटनेत्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली. कलाटे यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, राऊत यांनी खंडणीची मागणी केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी पक्षपातीपणा केला आहे. याविरोधात भाजपा, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकजूट केली आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यावर चौकशी करूनच कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तांनी शिष्टमंडळास सांगितले.

टीडीआरची फाईल मंजूर करण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार अभियंता अनिल राऊत यांनी केली होती. त्यानंतर कलाटे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर कर्मचारी महासंघाने केलेल्या निषेध सभेत नगरसेवकांना चोप द्यावा, असे विधान एका कर्मचाऱ्याने केले आहे. महापालिकेच्या अधिकाºयावरही दखलपात्र गुन्हे दाखल करा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मनसे गटनेते सचिन चिखले, भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे, उत्तम केंदळे, संदीप कस्पटे, राष्टÑवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, राजू बनसोडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, श्याम लांडे, नवनाथ जगताप, शिवसेना नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले, मीनल यादव, पौर्णिमा सोनवणे, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, अपक्ष नगरसेवक कैलास बारणे, नीलेश वराळे, बाबा कांबळे उपस्थित होते.

४नगरसेवक जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे ते जनतेची कामे करण्याची अधिकाºयांना विनंती करतात. तेच राहुल कलाटे यांनी केले. १३ फेब्रुवारी रोजी सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांनी गुन्ह्याची तक्रार केली. पिंपरी पोलीस निरीक्षकांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या दबावाखाली कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व कर्मचारी संघाने चुकीची भाषा वापरत आंदोलन केले.

४सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर संतोष कामठे गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल न करता केवळ अदखपात्र गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे नगरसेवक भीतीच्या वातावरणाखाली आहेत. त्यांना सुरक्षेची योग्य हमी द्यावी. तसेच सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर देखील दखलपात्र गुन्हा दाखल करावा, असेही म्हटले आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, ‘‘शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे दिला आहे. नगरसेवकाला चोप देण्याची भाषा करणाºयाच्या विरोधात तक्रार द्या. योग्य ती कारवाई केली जाईल.’’

Web Title: Submit the complaint to the 'Engineer', demand of all-party corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.