सुजाता श्रॉफ यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: April 20, 2017 06:35 AM2017-04-20T06:35:49+5:302017-04-20T06:35:49+5:30
पोलिसांनी भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर
पुणे : पोलिसांनी भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा जीव घेणा-या गंभीर गुन्हयात सुजाता जयप्रकाश श्रॉफ यांच्याविरूद्ध जाणीवपूर्वक जामीनपात्र कलम लावल्यामुळे तिला अवघ्या काही तासातच जामीन मिळाला, या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये टीकेची झोड उठल्याने पोलिसांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले, अखेर पोलिसांना तिच्यावर सदोष मनुष्यवधाचे कलम लावावे लागले.
दोन दिवसांपूर्वी दुपारी बाणेर येथे सुजाता श्रॉफने बेदरकारपणे कार चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना उडवले. त्यामध्ये इशिका ही तीन वर्षाची मुलगी आणि तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा हे ठार झाले. तर तिघेही गंभीर जखमी आहेत. सीसीटिव्ही कँमेरात हा अपघात बंदिस्त झाल्याने काही क्षणातच याचा व्हिडिओ व्हॉटस अपवर सर्वत्र फिरला. हा अपघात पाहताना सर्वांचेच मन सुन्न झाले. मात्र सुजाता श्रॉफ हिला अटक झाल्यानंतर अवघ्या काही तासातच जामीन मिळाल्यामुळे समाजातून टीकेची झोड उठली. पोलिसांनी हा अपघाताचा गुन्हा दाखल करताना ३०४ (अ)२७९, ३३८ कलम लावून गुन्हा दाखल केला. त्यामुळे तिला मंगळवारी सकाळी साडे नऊला अटक केल्यानंतर दुपारी लगेच जामीन मंजूर झाला.