पिंपरीत प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पाच वर्ष होते प्रेमसंबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:07 IST2022-04-14T16:07:03+5:302022-04-14T16:07:20+5:30
प्रियकर फोन करून तिला मानसिक त्रास देत असे

पिंपरीत प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पाच वर्ष होते प्रेमसंबंध
पिंपरी : तरुणीसोबत पाच वर्ष प्रेमसंबंध ठेऊन तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर फोन करून तिला मानसिक त्रास दिला. तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकर तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे २५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
तरुणीच्या आईने याप्रकरणी बुधवारी (दि. १३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पप्पू उर्फ सुनील शाम गोलाईत (वय २५, रा. परभणी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी आणि आरोपी यांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तरुणी ही वेगळ्या जातीची आहे. तो उच्चवर्णीय आहे अशा कारणावरून ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तरुणीला फोनवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे तपास करीत आहेत.