पिंपरीतील एच ए कंपनीतील कामगाराची आर्थिक नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:15 PM2019-02-02T18:15:22+5:302019-02-02T18:16:30+5:30

त्यांच्या मुलांनीही त्यांना परिस्थिती बदलेल, वाईट काळ निघून जाईल, असे सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र..

Suicides due to financial depression H A company worker | पिंपरीतील एच ए कंपनीतील कामगाराची आर्थिक नैराश्यातून आत्महत्या

पिंपरीतील एच ए कंपनीतील कामगाराची आर्थिक नैराश्यातून आत्महत्या

Next

पिंपरी : गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतून पगार झाला नाही, आर्थिक चणचणीमुळे नैराश्य आल्याने हिंदूस्थान अ?ँटीबायोटिक (एच.ए) कंपनीतील एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास थेरगांव, मंगलनगर येथे घडली. रामदास शिवाजीराव उकिरडे (वय.५१ रा.मंगलनगर,थेरगांव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नांव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास उकिरडे हे एच.ए कंपनीत लॅबमध्ये काम करत होते. गेल्या २० महिन्यापासून पगार न झाल्याने ते नैराश्यात होते. कंपनीतून घरी आल्यावर ते पगाराबाबत पत्नी आणि मुलांसमोर चर्चा करत होते. त्यांची पत्नी ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून घरखर्च चालवत होती. तरीही ते कायम नैराश्यात होते.  त्यांच्या मुलांनीही त्यांना परिस्थिती बदलेल वाईट काळ निघून जाईल, असे सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी शुक्रवारी घरी कोणी नसताना साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.   अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
 

Web Title: Suicides due to financial depression H A company worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.