सूर रायझिंग स्टार्सचे २५ जानेवारीला

By Admin | Published: January 24, 2017 02:01 AM2017-01-24T02:01:00+5:302017-01-24T02:01:00+5:30

मनोरंजनाच्या दुनियेत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगांची सप्तरंगी उधळण करणारे

Sur Rising Stars on January 25 | सूर रायझिंग स्टार्सचे २५ जानेवारीला

सूर रायझिंग स्टार्सचे २५ जानेवारीला

googlenewsNext

पिंपरी : मनोरंजनाच्या दुनियेत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगांची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातील भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ््या रंगांत सिरीयल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचाची गेल्या १६ वर्षांपासून घौडदौड सुरू आहे. आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत सखी मंचने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी रायझिंग स्टार ही मालिका कलर्स चॅनलवर ४ फेब्रुवारीपासासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री नऊला प्रक्षेपित होणार आहे.
याच निमित्ताने कलर्स व लोकमत सखी मंच आयोजित सूर राइझिंग स्टार्सचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम बुधवारी (दि. २५)शाहूनगर येथील पिरॅमिड हॉल या ठिकाणी दुपारी १ वाजता आयोजित केला आहे. १८ वर्र्षांच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमाची प्राथमिक फेरी दुपारी १२ वाजता घेण्यात येईल.
प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणारा कलाविष्कार म्हणजेच सूर रायझिंग स्टार्सचे हा कार्यक्रम. या स्पर्धेच्या माध्यमातून रायझिंग स्टार्स जगाला दिसणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sur Rising Stars on January 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.