महाराष्ट्र केसरीसाठी सुरेश नखाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:49 AM2018-12-18T02:49:35+5:302018-12-18T02:50:10+5:30
६२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा : माती व गादी विभागातून निवड
पिंपरी : जालना येथे होणाऱ्या ६२ व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी काळेवाडी, पिंपरी येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून संतोष सुरेश नखाते याने शाह फैझल कुरेशी याला चितपट केले. तर गादी विभागात किशोर हिरामण नखाते याने प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळवून आपला प्रवेश निश्चित केला. तसेच जानेवारी २०१९ ला मुंबईत होणाºया सीएम चषकसाठीही खेळाडूंची निवड करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंपरीतील काळेवाडी येथील तापकीर मळा येथे स्पर्धा घेण्यात आली. आखाडापूजन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते झाले. पहिली कुस्ती शंकर जगताप यांच्या हस्ते लावण्यात आली. समारोप प्रसंगी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने जयराम ऊर्फ जयवंत बाबूराव नढे यांना जीवनगौरव पुरस्कार प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, आॅलिम्पिकवीर मारुती आडकर, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संयोजक व ‘Þग’ प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, सचिव धोंडिबा लांडगे, खजिनदार दिलीप बालवडकर, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, काळुराम कवितके, आयोजक
नीलेश तापकीर, भारत केसरी विजय गावडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी माती विभागातून विजय मिळविलेला संतोष नखाते व गादी विभागातून विजयी झालेला किशोर नखाते हे पुण्यातील वारजे माळवाडी येथील सह्याद्री कुस्ती संकुल येथे सराव करतात.
सीएम चषक निकाल :
(५७ किलो गट) विशाल सोंडकर वि. वि. कुणाल जाधव. (६५ किलो गट) योगेश तापकीर वि. वि. परशुराम कॅम्प. (७४ किलो गट) निरंजन बालवडकर वि. वि. पृथ्वी भोईर. (८६ किलो गट) प्रसाद सस्ते वि. वि. कुणाल शेवाळे.
(खुला गट) किशोर नखाते
महिला गट : (४८ किलो) प्रतीक्षा लांडगे वि. वि. सारिका माळी (५४ किलो) स्वप्नाली काळभोर वि. वि. आरती बांबे.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :
कुमार गट
४(४५ किलो) : जाधव वि. वि. प्रणव सस्ते, (४८ किलो) : संकेत माने वि. वि. केदार लांडगे, (५१ किलो) : यश कलापुरे वि. वि. कार्तिक लोखंडे, (५५ किलो) : महेश जाधव वि. वि. किरण माने, (६० किलो) : समर्थ गायकवाड वि. वि. विनायक वाजे, (६५ किलो) : सोहम लोंढे वि. वि. यश नखाते, (७१ किलो) : देवांग चिंचवडे वि. वि. सिद्धार्थ लांडे, (८० किलो) : शुभम चिंचवडे वि. वि. रोहित काटे, (९२ किलो) : निखिल जगताप वि. वि. अक्षय करपे, (११० किलो) : यश कलाटे वि. वि. प्रतिक चिंचवडे
गादी विभाग खुला गट :
४(५७ किलो) : विशाल सोंडकर वि. वि. कुणाल जाधव, (६१ किलो) : दीपक कलापुरे वि. वि. कुणाल कंद, (६५ किलो) : योगेश्वर तापकीर वि. वि. परशुराम कॅम्प, (७० किलो) : राजू हिप्परकर वि. वि. रवींद्र गोरड, (७४ किलो) : निरंजन बालवडकर वि. वि. पृथ्वी भोईर, (७९ किलो) : शुभम गवळी वि. वि. विवेक शेलार, (८६ किलो) : प्रसाद सस्ते वि. वि. कुणाल शेवाळे, (९२ किलो) : अजिंक्य कुदळे वि. वि. गणेश साळुंखे, (९७ किलो) : विपुल वाळुंज वि. वि. हर्षवर्धन माने, (८६ ते १२५ किलो) महाराष्ट्र केसरी गट : किशोर नखाते वि. वि. प्रमोद मांडेकर.
माती विभाग खुला गट :
४(५७ किलो) : विनायक नाईक वि. वि. जय वाळके, (६१ किलो) : चेतन कलापुरे वि. वि. परमेश्वर सोनकांबळे, (६५ किलो) : शेखर लोखंडे वि. वि. धीरज बोºहाडे, (७० किलो) : अविनाश माने वि. वि. वैभव बारणे, (७४ किलो) : पवन माने वि. वि. अक्षय आढाळे, (७९ किलो) : ऋषीकेश बालवडकर वि. वि. निखिल नलावडे, (८६ किलो) : सूरज नखाते वि. वि. अनुराग रासकर, (९२ किलो) : संकेत धाडगे वि. वि. कमरुद्दीन चौधरी, (९७ किलो) : कानिफनाथ काटे वि. वि. आदर्श नाणेकर, (८६ ते १२५ किलो) महाराष्ट्र केसरी गट : संतोष नखाते वि. वि. शाह फैझल कुरेशी.