कोरोनाला हरविण्यासाठी पिंपरीत १० दिवसांत २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण होणार: महापौर उषा ढोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:12 PM2020-09-16T14:12:58+5:302020-09-16T14:18:44+5:30

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार

Survey of 24 lakh citizens in 10 days to defeat Corona; Mayor Usha Dhore | कोरोनाला हरविण्यासाठी पिंपरीत १० दिवसांत २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण होणार: महापौर उषा ढोरे

कोरोनाला हरविण्यासाठी पिंपरीत १० दिवसांत २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण होणार: महापौर उषा ढोरे

Next
ठळक मुद्देकोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे

पिंपरी : कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नियोजन आढावा बैठक स्थायी समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी  आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य विलास मडीगेरी,अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे.’’
आमदार जगताप म्हणाले, ‘‘मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान २५ घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करणाऱ्या स्वयंसेवकांना मानधन द्यावे.’’
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. ५० वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये तसेच काम करणाऱ्या स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे. प्रत्येक पथकामध्ये एक महिला, एक पुरुष स्वयंसेवक व मनपा कर्मचारी असावा.’’
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘१२ स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व १२ स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवकांना किमान १० वी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे.’’

दोन टप्प्यात मोहीम
मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दि. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि दुसरा टप्पा १४  ते २४ ऑक्टोबर असणार आहे.  प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान तपासणे, ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांच्या मदतीने मोहीम होणार आहे.

Web Title: Survey of 24 lakh citizens in 10 days to defeat Corona; Mayor Usha Dhore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.