टाटा मोटर्समधील माजी पदाधिकाऱ्यांचे निलंबन

By admin | Published: April 26, 2017 03:56 AM2017-04-26T03:56:09+5:302017-04-26T03:56:09+5:30

टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापनाने टाटा मोटर्स एम्ल्पॉईज युनियनच्या आठ माजी पदाधिकाऱ्यांना निलंबित केले. नेमून दिलेल्या कामांच्या

Suspension of ex-office bearers of Tata Motors | टाटा मोटर्समधील माजी पदाधिकाऱ्यांचे निलंबन

टाटा मोटर्समधील माजी पदाधिकाऱ्यांचे निलंबन

Next

पिंपरी : टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापनाने टाटा मोटर्स एम्ल्पॉईज युनियनच्या आठ माजी पदाधिकाऱ्यांना निलंबित केले. नेमून दिलेल्या कामांच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने तसेच काम सोेडून इतरत्र आढळून आल्याने माजी पदाधिकाऱ्यांवर ही ‘सस्पेंशन पेंडिंग एन्क्वायरी’ची कारवाई केली आहे.
यामध्ये युनियनचे माजी अध्यक्ष यशवंत काळे, प्रकाश मुगडे, माजी कार्याध्यक्ष शिवाजी शेडगे, जनरल सेक्रेटरी सुरेश फाले, प्रशांत पोमण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यांसह माजी अध्यक्ष हनुमंत गावडे, सुजित पाटील, नगरसेवक एकनाथ पवार यांच्यावर चौकशीसाठी निलंबनाचे पत्र सोमवारी पाठविले आहे.
कंपनीत १७ एप्रिलपासून चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच २ मेपासून दुचाकी वाहनांनाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक कामगाराने कंपनीची बस वापरावी, असे व्यवस्थापनाकडून कामगारांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीची बस मुख्य रस्त्यावरूनच धावत असते. रस्त्यापासून दूर अंतरावर राहत असलेल्या कामगाराला रस्त्यापर्यंत येताना पायपीट करावी लागते, असे कामगारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of ex-office bearers of Tata Motors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.