विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 12:24 PM2019-06-03T12:24:37+5:302019-06-03T19:16:55+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रे चे आयोजन करण्यात आले होते.

swords, air rifle in shobhayatra of Vishwa Hindu Parishad;crime filed against 250 worker | विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा 

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा 

Next

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होत्या. मुलींनी एयर रायफल चे ट्रिगर दाबून आवाज केले. तसेच पाच मुलींनी विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहाच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला.
या प्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे. तर शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर व इतर २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Web Title: swords, air rifle in shobhayatra of Vishwa Hindu Parishad;crime filed against 250 worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.