Pimpri Chinchwad: शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला बोपखेलमधून अटक, दिघी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:14 IST2023-07-14T17:11:07+5:302023-07-14T17:14:05+5:30
रात्री आठच्या सुमारास बोपखेल येथे कारवाई करण्यात आली...

Pimpri Chinchwad: शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला बोपखेलमधून अटक, दिघी पोलिसांची कारवाई
पिंपरी : तडीपार केलेल्या आरोपीला शहरात येऊन शस्त्र बाळगल्याप्रकरणी दिघीपोलिसांनीअटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १२) रात्री आठच्या सुमारास बोपखेल येथे करण्यात आली.
यश ऊर्फ बबलू मारुती दिसले (वय २२, रा. बोपखेल ) असे अटक गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह कृष्णा कुमार यादव (रा. बोपखेल) यालादेखील अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस अंमलदार शरद विंचू यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी यश दिसले याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारचा कालावधी संपण्यापूर्वी तो बेकायदेशीरपणे शहरात आला. त्याने स्वतःजवळ बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले. याप्रकरणी त्याला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.