Pimpri Chinchwad Crime: चिंचवडमध्ये तडीपार गुंडाच्या आवळल्या मुसक्या; पिस्तूल, काडतूस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:41 IST2024-03-11T11:39:25+5:302024-03-11T11:41:46+5:30
चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली....

Pimpri Chinchwad Crime: चिंचवडमध्ये तडीपार गुंडाच्या आवळल्या मुसक्या; पिस्तूल, काडतूस जप्त
पिंपरी : तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.
सुनील मारुती लोणी (२२, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार पंकज भदाणे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील लोणी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २४ एप्रिल २०२३ रोजी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. त्याचा तडीपारीचा कालावधी अवघे काही दिवस शिल्लक असताना तो नागसेननगर झोपडपट्टी येथे रेल्वे पटरीजवळ चिंचवड येथे आढळून आला.
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४२ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी सुनील याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक आर. जे. व्हरकाटे तपास करीत आहेत.