ताडपत्री भ्रष्टाचार फलकाने वेधले लक्ष

By Admin | Published: June 18, 2017 03:31 AM2017-06-18T03:31:06+5:302017-06-18T03:31:06+5:30

सत्ताधाऱ्यांनी केलेला ताडपत्री भ्रष्टाचार हाच का तो पारदर्शक कारभार? तेवीसशे रुपयांची ताडपत्री चौतीसशे रुपयाला निविदा काढूनदेखील थेट पद्धतीने दिलेल्या

Tadpreet's attention to the corruption scandal | ताडपत्री भ्रष्टाचार फलकाने वेधले लक्ष

ताडपत्री भ्रष्टाचार फलकाने वेधले लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सत्ताधाऱ्यांनी केलेला ताडपत्री भ्रष्टाचार हाच का तो पारदर्शक कारभार? तेवीसशे रुपयांची ताडपत्री चौतीसशे रुपयाला निविदा काढूनदेखील थेट पद्धतीने दिलेल्या ताडपत्री कारभाराला म्हणनार का पारदर्शक कारभार? अशी फलकबाजी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने पालखी मार्गावर केली आहे. ताडपत्रीत भ्रष्टाचार झाल्याचे ऐकून वारकऱ्यांनी सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, ताडपत्री भ्रष्टाचाराचे लागलेले फलक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत आहेत. इतर वेळी हद्दीचा वाद घालणाऱ्या पालिकेने फलक लागल्याचे समजताच तत्परतेने काढून टाकले.

- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीत आगमन झाले. राष्ट्रवादीने पालखी मार्गावर ताडपत्रीत झालेल्या भ्रष्टाचाराले फलक लावले होते. फलकबाजी करून भाजपाची अडचण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे फलक काढून टाकले आहेत.

Web Title: Tadpreet's attention to the corruption scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.