प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करा- रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 05:01 AM2018-07-03T05:01:25+5:302018-07-03T05:01:34+5:30
शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे.
पिंपरी : शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपााययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकाºयांना दिल्या.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात आळंदीजवळील शासकीय विश्रामगृहात रविवारी पर्यावरणमंत्री कदम यांची महापालिका अधिकाºयांबरोबर बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांनी मैला सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची अधिकाºयांकडून माहिती घेतली. इंद्रायणी नदीत सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, यांचीही अधिकाºयांना विचारणा केली. शहरातून १६ किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी वाहते. या भागांत एकूण २५ एमएलडी मैला सांडपाणी तयार होते. त्यातील १७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. ७ ते ८ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. पालिका व अमृत योजनेतून चºहोली व चिखली येथे नवीन मैला शुद्धीकरण प्रकल्प तयार होत आहेत. डिसेंबरअखेर प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेलेच सांडपाणी नदीत सोडले जाईल, अशी माहिती संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण मंत्र्यांना दिली.