आधी नेत्यांना शपथ घ्यायला लावा

By admin | Published: January 29, 2017 04:02 AM2017-01-29T04:02:46+5:302017-01-29T04:02:46+5:30

‘‘मावळातील नेते मंडळींत मतभेद व दुफळी होत असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणू’’ अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे

Take the oath before the leaders | आधी नेत्यांना शपथ घ्यायला लावा

आधी नेत्यांना शपथ घ्यायला लावा

Next

कामशेत : ‘‘मावळातील नेते मंडळींत मतभेद व दुफळी होत असल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार निवडून आणू’’ अशी शपथ कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केली.
त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते व अनेक पदाधिकाऱ्यांमधून आवाज आला, ‘आधी पक्षाच्या नेते मंडळींना शपथ द्यायला लावा, मग आम्ही घेऊ’. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर सुरू होता.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. तरीही नेते व कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे दर्शन
झालेच. कार्यकर्त्यांनी आमच्यापेक्षा प्रथम नेत्यांना पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची शपथ घ्यायला लावा, अशी आग्रही मागणी केली.
अजित पवार यांनी भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान म्हणतात, मी फकीर आहे, पण सर्वसामान्य माणूस संसारी आहे. हे त्यांच्या का लक्षात येत नाही? अशी टीका त्यांनी केली.
माजी आमदार कृष्णराव भेगडे, राजेंद्र खांदवे, वैशाली नागवडे, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापू भेगडे, गणेश खांडगे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, सभापती अतिष परदेशी, सचिन घोटकुले, ललिता कोतूळकर, बाळासाहेब काजळे, अतुल वायकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Take the oath before the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.