तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी भेगडे

By admin | Published: October 16, 2015 12:50 AM2015-10-16T00:50:40+5:302015-10-16T00:50:40+5:30

तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास समितीच्या माया भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम

Talegaon Dabhade will be the president of the city | तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी भेगडे

तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी भेगडे

Next

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास समितीच्या माया भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरपालिका सभागृहात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा झाली. पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी माया तुषार भेगडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने आणि तो वैध असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. मावळत्या नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्याकडून भेगडे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. नगरपालिका प्रशासनातर्फे प्रांताधिकारी थोरवे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरपालिकेच्या प्रांगणात शहर विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला. नगरसेवक गणेश खांडगे, विरोधी पक्षनेते सुनील शेळके, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, सुलोचनाताई आवारे, गणेश काकडे, बबनराव भेगडे, शिक्षण मंडळाचे सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, नगरसेविका सुजाता खेर आणि गणेश ढोरे यांनी नूतन नगराध्यक्षांसाठी अभिनंदनपर भाषणे केली. सभागृहात शहर विकास समितीचे सुरेश चौधरी, कृष्णा कारके, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, सभागृह नेते बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, चंद्रभान खळदे, शालिनी खळदे, सुनंदा मखामले, तनुजा जगनाडे, रंजना भोसले आदी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक सुशील सैंदाणे, संतोष लोणकर, अमृता टकले आदी सदस्य उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. (वार्ताहर)

Web Title: Talegaon Dabhade will be the president of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.