तळवडे गावठाण विकणे आहे

By admin | Published: October 11, 2016 01:27 AM2016-10-11T01:27:43+5:302016-10-11T01:27:43+5:30

महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे

Talegaon is selling gaothan | तळवडे गावठाण विकणे आहे

तळवडे गावठाण विकणे आहे

Next

तळवडे : महापालिकेची फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये निवडणूक होणार असून, प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभागरचना करताना तळवडे आयटी पार्क, जोतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्तीपर्यंतचा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रभाग बनवताना पूर्वी असलेल्या वॉर्डची मोठ्या प्रमाणात विभागणी करण्यात आली असल्याने तळवडे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात निवडणूक प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करताना तळवडे गावठाण विकणे आहे, चिखलीकरांना प्राधान्य अशा आशयाचा फलक लावला आहे.
तळवडे गावठाणचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तळवडे व रुपीनगर हा ग्रामपंचायत असलेला भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर
वॉर्ड रचनेत तळवडे व रुपीनगर हा एक नंबरचा वॉर्ड होता. पण, आता प्रभागरचनेत तळवडेचा एक नंबर प्रभागात, तर रुपीनगरचा बारा नंबर प्रभागात समावेश करण्यात आल्यामुळे प्रभाग क्रमांक एकचे विभाजन झाले आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी तळवडे रुपीनगर ग्रामपंचायत होती. त्यानंतर तळवडे गावठाण रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती असा वॉर्ड होता. त्यानंतर तळवडे गावठाण आणि रुपीनगर असा वॉर्डरचना करण्यात आली. या प्रत्येक वेळेस रचना करताना ग्रामपंचायतीचा भाग अविभाज्य ठेवला गेला.
पण, २०१७च्या निवडणुकीसाठी मात्र प्रभागरचना करताना तळवडे ग्रामपंचायत असलेल्या तळवडे आणि रुपीनगर भागाचे शीर आणि धड असे विभाजन केली असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. (वार्ताहर)
ग्रामस्थ संतप्त : प्रतिनिधित्व न मिळण्याची भीती
मुळातच तळवडे व रुपीनगर परिसर पहिल्यापासून एकाच प्रभागात अथवा वॉर्डमध्ये असून, रेड झोन आणि त्यानुषंगाने असलेल्या अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, तसेच विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्याही सारख्याच आहेत. महापालिका सभागृहात या समस्यांची जाण असलेला प्रतिनिधी पोटतिडकीनं समस्या मांडू शकतो, म्हणून तळवडे विभागाचा समावेश प्रभाग क्रमांक १२मध्ये असणे सोयीचे ठरेल, पण प्रभागरचना करताना चिखली येथील मतदार संख्येच्या मानाने तळवडेची मतदार संख्या अतिशय तुटपुंजी संख्या ठरेल. अशी प्रभागरचना केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच तळवडे गावातील प्रतिनिधी निवडला जाऊ शकत नसल्याचे उघड झाले असल्यामुळे ग्रमस्थांतर्फे निवडणूक प्रशासनाचा निषेध केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Talegaon is selling gaothan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.