भक्ती-शक्ती चौकात फडकणार उंच तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:56 AM2017-08-04T02:56:38+5:302017-08-04T02:56:38+5:30
महापालिका परिसरातील निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे.
पिंपरी : महापालिका परिसरातील निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. हा ध्वज उभारण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाचे गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी अखेर परवानगी दिली आहे.
महानगरपालिकेच्या निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानात १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यासंदर्भात महापालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरू केली होती. उद्योगनगरीचे प्रवेशद्वार हे भक्ती-शक्ती चौक असून तिथे नियोजनही करण्यात आले. दरम्यान या ध्वज फडकविण्याच्या प्रस्तावास परवानगी मिळावी, यासाठी १७ मे २०१७ रोजी मी गृहमंत्रालयाला खासदार अमर साबळे यांनी पत्र पाठवले होते. गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी ध्वज फडकविण्याची परवानगी दिली आहे.