सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू

By admin | Published: March 25, 2016 03:42 AM2016-03-25T03:42:08+5:302016-03-25T03:42:08+5:30

मिळकतकराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. अधिकाधिक कराचा भरणा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही करसंकलन विभागीय कार्यालये सुरू राहणार आहेत.

Tax payment on holiday also started | सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू

सुटीच्या दिवशीही कर भरणा सुरू

Next

पिंपरी : मिळकतकराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. अधिकाधिक कराचा भरणा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही करसंकलन विभागीय कार्यालये सुरू राहणार आहेत.
शहरातील ३ लाख १८ हजार ३८१ मिळकतधारकांनी ३७७ कोटी ५३ लाखांचा भरणा केला आहे. तर थकबाकी असलेल्या महापालिका हद्दीतील १४१ मिळकतधारकांना जप्तीचे अधिपत्र बजाविण्यात आले होते. त्यापैकी ९० मिळकतधारकांकडून ३ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही करसंकलन कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.
(प्रतिनिधी)

 

Web Title: Tax payment on holiday also started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.