शिक्षकांच्या तणावाचे विद्यार्थी बळी, किरकोळ कारणांवरूनही मारहाणीच्या गंभीर घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:48 AM2017-11-01T05:48:58+5:302017-11-01T05:49:07+5:30
श्रमाचा कमी मोबदला, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडू लागला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार त्यांच्या हातून घडत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मात्र ही एक प्रकारची विकृती असल्याचे म्हटले आहे.
पिंपरी : श्रमाचा कमी मोबदला, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडू लागला असून, त्यामुळे
विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार त्यांच्या हातून घडत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मात्र ही एक प्रकारची विकृती असल्याचे म्हटले आहे.
पिंपळे गुरव येथील भावनगरमध्ये राहणाºया देव कश्यप या अडीच वर्षांच्या बालकाला डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यांपूर्वी शहरात घडली.
त्यानंतर श्रीधरनगर, चिंचवड
येथे दहा वर्षांच्या मुलाला जबरी मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
अमृता कॉलनी, विल्यमनगर, पिंपळे गुरव येथे भाग्यश्री पिल्ले ही महिला खासगी शिकवणी घेते. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही कश्यप कुटुंबीयांनी मुलाला इंग्रजी शिक्षण देण्याची मनीषा बाळगून खासगी शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता. घराजवळ काही अंतरावर असलेल्या शिकवणी वर्गात ते मुलाला पाठवत होते. या बालकाला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. बालकाचा चेहरा, डोळे सुजले. त्या वेळी वडील संतोष कश्यप, आई लक्ष्मी कश्यप यांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भारतीय दंडसंंहिता ३२४, बाल न्याय (मुलांची काळजी संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर शिक्षिकेला गजाआड केले होते. शहरात खळबळ उडवून देणारी ही घटना घडली होती.
ही घटना ताजी असतानाच श्रीधरनगर, चिंचवड येथे श्रीशांत बेळ्ळे या पाचवीत शिकणाºया दहा वर्षांच्या मुलाला किशोर खरात या शिक्षकाने जबरी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. चिंचवड पोलिसांकडे गुन्हा दाखल होताच, हा शिक्षक फरार झाला आहे. शिक्षकी पेशातील व्यक्ती अशा वागतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही एक प्रकारची विकृती आहे, असे या घटनांतून निदर्शनास येते. वेळीच अशा व्यक्तींना शिक्षा झाली, तर या प्रकारच्या घटनांना आळा बसेल. समाजानेही अशा घटना, कृत्यांकडे दुर्लक्ष करू नये. कायद्याबद्दल जागरूकता नसल्याने परिणामांचा विचार न करता त्यांच्याकडून
चुकीची कृत्ये घडतात. शिक्षकी पेशात चुकून आलेल्यांकडूनही अशी कृत्येघडू शकतात. ही एक शक्यता आहे.
- डॉ. किशोर गुजर,
मनोविकार तज्ज्ञ