अभ्यास कमी करतो म्हणून शिक्षकांनी केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:47 PM2019-03-18T17:47:46+5:302019-03-18T17:48:49+5:30

‘तुला माझ्या विषयात शुन्य मार्क देतो’ असे म्हणत अथर्वच्या कानाखाली दोन चापट मारल्या.

As teachers beaten to son due to decrease study | अभ्यास कमी करतो म्हणून शिक्षकांनी केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

अभ्यास कमी करतो म्हणून शिक्षकांनी केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

googlenewsNext

पिंपरी : अभ्यास कमी करतो म्हणून दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. ही घटना दापोडीतील डी.टी. ज्युनियर कॉलेजच्या बाहेर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. अथर्व शशिकांत देशपांडे (वय १७, रा. मंत्री निकेकत ११ नं. बसस्टॉपजवळ, दापोडी) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी उजागरे सर व जावळे सर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अथर्व हा दापोडीतील डी. टी. पाटील ज्युनियर कॉलेजनमध्ये अकरावीला सायन्सच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी उजागरे याने अथर्वला वर्गाच्या बाहेर बोलाविले तसेच अभ्यास कमी करतो या कारणावरुन ‘तुला माझ्या विषयात शुन्य मार्क देतो’ असे म्हणत अथर्वच्या कानाखाली दोन चापट मारल्या. तसेच जावळे याने अथर्वच्या डोक्यावर, पाठीवर, नाकावर हाताने मारहाण केली. यामुळे अथर्वच्या नाकातून, तोंडातून रक्त येवून त्यास दुखापत झाली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: As teachers beaten to son due to decrease study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.