शंभर महिला वाहनचालकांची टीम, महापालिकेचा उपक्रम, प्रवास सुरक्षित होण्यासाठी देणार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:09 AM2017-09-15T03:09:43+5:302017-09-15T03:10:09+5:30
पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि पुण्यात विविध ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महिलांनाच वाहतूक सेवेत सामावून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. गरजू १०० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि पुण्यात विविध ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महिलांनाच वाहतूक सेवेत सामावून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. गरजू १०० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाºया शहरातील रहिवासी महिलेला मोफत, तर दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलेला २५ टक्के शुल्क आकारून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती सभेपुढे मंजुरीस ठेवला होता. या प्रस्तावात दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच हे प्रशिक्षण देण्याची अट घातली होती. त्याऐवजी एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना मोफत आणि दोन लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाºया महिलांना २५ टक्के शुल्क आकारून महापालिकेच्या वतीने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आणि त्यासाठी येणाºया खर्चाला मंजुरी दिली.
वाहन चालवण्याचे केवळ प्रशिक्षण न देता महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेतल्याचे सावळे यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना वाहतूक सेवेत सामावून घेतले जाणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या १०० महिलांची टीम तयार करून त्यांना ओला, उबेर यांसारख्या वाहतूक क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये वाहनचालक म्हणून काम मिळवून देण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे, तसेच हिंजवडीसारख्या भागात काम करणाºया महिलांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी महिला वाहनचालक उपलब्ध व्हावेत, असा उद्देश असल्याचे सावळे यांनी सांगितले.
महापालिकेने विविध संस्था व कंपन्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवल्यास गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसे झाल्यास महापालिकेच्या वतीने वाहन चालवण्यासाठी दिल्या जाणाºया प्रशिक्षणाचा उद्देश सफल होईल. वाहन चालवण्याच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. महिला प्रवाशांसाठी महिला वाहनचालक उपलब्ध झाल्यास ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे. तसेच विविध
ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित होईल. आयुक्तांनाही या उपक्रमासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्याची सूचना अधिकाºयांना केली आहे. - सीमा सावळे, स्थायी समिती अध्यक्ष