Pimpri Chinchwad: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने आईचेच कपडे फाडले, भावावरही कात्रीने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:43 IST2024-06-12T19:41:54+5:302024-06-12T19:43:04+5:30
वाकड येथे जगताप डेअरी चौक परिसरात सोमवारी (दि. १०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने आईचेच कपडे फाडले, भावावरही कात्रीने वार
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचे कपडे फाडून विनयभंग केला. तसेच आईच्या मदतीला आलेल्या भावावरही कात्रीने वार केले. वाकड येथे जगताप डेअरी चौक परिसरात सोमवारी (दि. १०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत ५५ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ११) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांचा ३५ वर्षीय लहान मुलगा घरी आला. त्याने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला.
या कारणावरून संतापलेल्या मुलाने आईच्या अंगावरील कपडे फाडत तिला फरफटत घराबाहेर नेले. तसेच आईला शिवीगाळ केली. त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. आईच्या मदतीला आलेल्या मोठ्या भावावर ३५ वर्षीय मुलाने कात्रीने वा करून जखमी केले. तसेच शेजारील महिला भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली.