हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:28 IST2025-03-19T09:28:13+5:302025-03-19T09:28:34+5:30
हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले

हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू
पुणे : व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना 8 च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल बस ला अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. इतर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर आहेत.