‘आरटीई’च्या तक्रार निवारणासाठी दहा मदत केंद्रे
By Admin | Published: March 18, 2016 03:10 AM2016-03-18T03:10:47+5:302016-03-18T03:10:47+5:30
आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळणे, पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील १० ठिकाणी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरू के ली आहेत.
पिंपरी : आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळणे, पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील १० ठिकाणी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरू के ली आहेत.
भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. किड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली आहेत. आरटीईचे कामकाज पाहण्यासाठी मदत केंद्रांवर संपर्क अधिकारी व समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच
संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचीही नेमणूक केली आहे. तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे काम पाहणार आहेत. आरटीई वेबसाइटवर संबंधित अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर लवकरच अपलोड होतील.
दरम्यान गेल्यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये मोठ्या
प्रमाणावर गोंधळ झाला होता त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. (प्रतिनिधी)
आरटीई २५ टक्के आरक्षित जागेवर आॅनलाइन प्रवेशासाठी दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत शाळा नोंदणी होणार आहे, तर बालकांसाठी दि. २४ ते ७ एप्रिल या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. प्रवेशाचा लकी ड्रॉ दि. ११ एप्रिलला काढला जाणार आहे.