तळेगावात दहा कोटींचे व्यापारी संकुल

By admin | Published: November 26, 2015 12:47 AM2015-11-26T00:47:12+5:302015-11-26T00:47:12+5:30

नगर परिषदेच्या वतीने १० कोटी ५८ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे आणि ३८ हजार चौरस फुटांचे व्यापारी संकुल शासनाच्या योजनेतून उभारण्यात येणार आहे

Tens of thousands of merchant packages in Talegaon | तळेगावात दहा कोटींचे व्यापारी संकुल

तळेगावात दहा कोटींचे व्यापारी संकुल

Next

तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या वतीने १० कोटी ५८ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे आणि ३८ हजार चौरस फुटांचे व्यापारी संकुल शासनाच्या योजनेतून उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र, शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत वाट न पाहता व्यापारी संकुलाचे काम नगर परिषदेकडून स्वबळावर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गटनेते बापू भेगडे यांनी दिली.
व्यापारी संकुलाचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याचे नगराध्यक्षा माया भेगडे आणि मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले. संकुलाच्या तीन इमारतीत एकूण ४८ दुकाने आणि ३० कार्यालये प्रस्तावित आहेत.
नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या आवारात ३ कोटी ७१ लाख ४१ हजार ८५० रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलास शासनाने मंजुरी दिली आहे. नियोजित क्रीडा संकुलात बहुउद्देशीय सेवेसाठी सभागृह, व्यायामशाळा, वाहनतळ, बॅडमिंटन हॉल, इनडोअर कुस्ती केंद्र आणि दीडशे क्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा भेगडे यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत एकूण ४२ विषयांना मंजुरी देण्यात आली. मंजूर कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा भेगडे यांनी सांगितले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस पक्षप्रतोद बापू भेगडे, नगरसेवक गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, नगरसेविका रंजना भोसले, शालिनी खळदे, सुनंदा मखामले आणि मुख्याधिकारी कैलास गावडे उपस्थित होते.
शहरातील पाणीपुरवठा पुरेसा आणि नियमित करण्यासाठी सोमाटणे पंप हाऊसच्या जॅकवेल आणि ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील बंदिस्त गटरांचे बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, संत तुकारामनगर आणि राव कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, आवश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविणे, तसेच बॅलाडोर सोसायटीसह यशवंतनगर, मस्करनेस कॉलनी व उमंग सोसायटीत मिनी हायमास्ट बसविण्याच्या कामांना सभेने मंजुरी दिली.
हुंडेकरी, विद्याविहार, मनोहरनगर, म्हाडा, सत्यकमल कॉलनीतील आरक्षित जागेवर खेळणी बसविण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेतील कागदपत्रांचे डिजिटायझेशन करणे, तसेच संगणक संच बसविण्यास समिती सदस्यांनी मंजुरी दिली.(वार्ताहर)

Web Title: Tens of thousands of merchant packages in Talegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.