पिंपरीत जमीन बळकावण्याच्या उद्देशाने ठोकला तंबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 03:26 PM2021-05-25T15:26:31+5:302021-05-25T15:26:38+5:30
१४ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी: जमीन बळकावण्यासाठी आलेल्या १४ जणांनी बेकायदेशीररित्या प्रवेश करून तंबू ठोकत दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला आहे. याप्रकरणी त्या चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० डिसेंबर २०२० ते २४ मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
खेमचंद उत्तमचंद भोजवाणी (वय ५७, रा. वाकड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तुकाराम जयवंत जगताप, अशोक जयवंत जगताप, सर्जेराव जयवंत जगताप, प्रफुल रामचंद्र रंधवे (सर्व रा. पिंपळे सौदागार) आणि इतर दहा जण (नाव, पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या जागेत बेकायदेशीरित्या प्रवेश केला. त्यावर कापडी फलक लावून तंबूही ठोकला. तसेच धमकी देऊन दहशतही निर्माण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश गायकवाड तपास करत आहेत.