मतदान यंत्राची चाचणी

By admin | Published: February 13, 2017 01:59 AM2017-02-13T01:59:05+5:302017-02-13T01:59:05+5:30

चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दिनांक२१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे, सातारा, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतून

Testing of Voting Equipment | मतदान यंत्राची चाचणी

मतदान यंत्राची चाचणी

Next

पिंपरी : चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दिनांक२१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे, सातारा, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतून मतदान यंत्रे आली आहेत, तर १४ ते १६ फेब्र्रुवारीला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी ३२ प्रभागांतून १२८ प्रभागांतून एकूण ७७८ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाची प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच राजकीय रणधुमाळीही रंगात आली आहे.
या मतदानासाठी सुमारे दहा हजार मतदान यंत्रे असणार
आहेत. याविषयी डॉ. यशवंत
माने म्हणाले, ‘‘पुणे, सातारा, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतून आलेल्या सर्व मतदान यंत्रांची सोमवारी उमेदवार व प्रतिनिधींसमोर प्रात्यक्षिक सादर केले जाणार
आहे. मतदान यंत्रे १९ फेब्रुवारीला
सर्व मतदान केंद्रावर पाठविण्यात येणार आहेत.’’(प्रतिनिधी)

Web Title: Testing of Voting Equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.