Pimpri Chinchwad: ‘कस्टम’च्या पार्सलची थाप, महिलेस २९ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 13:17 IST2023-09-16T13:16:46+5:302023-09-16T13:17:58+5:30
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...

Pimpri Chinchwad: ‘कस्टम’च्या पार्सलची थाप, महिलेस २९ लाखांचा गंडा
पिंपरी : दिल्लीतील कस्टम कार्यालयात तुमचे पार्सल अडकले आहे. ते घेण्यासाठी पैसे द्या, अशी बतावणी करत महिलेची २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी येथे ८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात ३६ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो दिल्ली कस्टम कार्यालयामधून बोलत असल्याचे सांगितले. महिलेच्या नावार पार्सल आले असून ते घेण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे म्हणत तिच्याकडून ऑनलाइन पद्धतीने २९ लाख २० हजार ७०० रुपये घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने फिर्याद दाखल केली.