ग्रंथदिंडीत लोक संस्कृतीचा जागर! शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात

By विश्वास मोरे | Published: January 6, 2024 03:39 PM2024-01-06T15:39:46+5:302024-01-06T15:41:00+5:30

मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावीनगरीत पोहचली....

The awakening of folk culture in Granthdindi! 100th All India Theater Conference begins | ग्रंथदिंडीत लोक संस्कृतीचा जागर! शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात

ग्रंथदिंडीत लोक संस्कृतीचा जागर! शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात

मोरया गोसावी नगरी (चिंचवड) : ढोल वाजला, हलगी कडाडली..., टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी नाचले....,  वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या - मुरळी यांनी लोकसंस्कृतीचा जागर केला. लोककलावंतांच्या अपूर्व उत्साहात अपूर्व  शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी झाली. मराठी रंगभूमीवरील कलावंतांची मांदियाळी या ठिकाणी जमली होती. महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून नाट्य दिंडीला सकाळी साडेआठला सुरुवात झाली. मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावीनगरीत पोहचली.

दिंडी मार्गावरील रस्त्यावर मोहक रंगवली रेखाटली होती. ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे परिधान केले होते. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली.

सेल्फीसाठी गर्दी -

चिंचवडकरांनी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्य दिंडीत दिसल्याने नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला,  ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

मोरया गोसावी यांच्यानगरीत नाट्य पंढरी!

पिंपरी - चिंचवडकरांची सकाळ ढोल, ताशा अंन लेझीम अन् जयघोषाच्या आवाजाने झाली. त्यात सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या - मुरळी ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव या रसिकांनी यावेळी अनुभवला.

या कलावंतांचा सहभाग! 

नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.

Web Title: The awakening of folk culture in Granthdindi! 100th All India Theater Conference begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.