डॉक्टर होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं; कार उलटल्याने MBBS च्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 02:08 PM2023-04-30T14:08:12+5:302023-04-30T14:08:23+5:30

तरुणी पिंपरीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती

The dream of becoming a doctor remained incomplete Accidental death of MBBS student after car overturns | डॉक्टर होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं; कार उलटल्याने MBBS च्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

डॉक्टर होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं; कार उलटल्याने MBBS च्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

googlenewsNext

पिंपरी : भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून उलटल्याने एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर पाचजणी जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. २९) पहाटे जुन्या पुणे - मुंबई महामार्गालगत मदर तेरेसा उड्डाणपुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला.

कृतिका कौर (२३, सध्या रा. महिंद्रा एमकेआर सोसायटी, पिंपरी) असे या अपघातातमृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर दिगजोत धिमन (२४, महिंद्रा इन्फिनिया सोसायटी, पिंपरी), दृष्टी जिग्नेश ठक्कर (२४), मणी तोमल (वय २४), अनुष्का यादव (वय २४), लुईस बॅरेटो बेनेझोला (२२, सर्व रा. डी. वाय. पाटील कॉलेज हॉस्टेल, पिंपरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृतिका शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास कृतिका मैत्रिणींसोबत कारने जात होती. त्यावेळी दिगजोत धिमन कार चालवत होती. दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत मदर तेरेसा उड्डाणपुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला त्यांची कार धडकली. वेग जास्त असल्याने कार उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कृतिका कौर हिचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजणी जखमी झाल्या आहेत.

Web Title: The dream of becoming a doctor remained incomplete Accidental death of MBBS student after car overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.