बिबट्या आला रे आला..! संत कबीर उद्यानात बिबट्या आढळल्याची घटना

By विश्वास मोरे | Updated: February 2, 2025 12:25 IST2025-02-02T12:25:47+5:302025-02-02T12:25:47+5:30

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.  

The leopard has arrived Incident of leopard being found in Sant Kabir Park | बिबट्या आला रे आला..! संत कबीर उद्यानात बिबट्या आढळल्याची घटना

बिबट्या आला रे आला..! संत कबीर उद्यानात बिबट्या आढळल्याची घटना

विश्वास मोरे 

पिंपरी :
पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण परिसरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून दोन तासाच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्याला पकडून बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे.


 

पिंपरी चिंचवड परिसरातील प्राधिकरण निगडी प्राधिकरण मधील लोकमान्य रुग्णालयाच्या पाठीमागील भागामध्ये सकाळी साडेसहा वाजता बिबट्याचे दर्शन झाले आहे,   असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पाषाण येथील रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी प्राधिकरणामध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांनी संबंधित जागेची पाहणी केली. तोपर्यंत या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. त्यांनी कबीर उद्यान नाच्या परिसरातील रस्ते बंद केले  नियंत्रण आणले.

रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला बिबट्या कोठे आहे याची पाहणी केली त्यानंतर तो प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक यांच्या घरात असल्याचे दिसले त्यानंतर रेस्क्यू टीमच्या एकाने डॉट च्या माध्यमातून इंजेक्शन दिले आणि काही मिनिटातच साडेअकराच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्याला पकडून रेस्क्यू टीमने बावधन येथील  बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. 
 
2006 मध्ये ही बिबट्याची झाले होते दर्शन !

प्राधिकरणातील आकुर्डी, निगडी परिसरामध्ये २००६ मध्ये ही बिबट्या आढळून आला होता. त्यावेळी बिबट्याला पकडण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागला होता. मात्र बिबट्याला पकडल्यानंतर घाबरून त्याचा मृत्यू झाला होता.

Web Title: The leopard has arrived Incident of leopard being found in Sant Kabir Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.