तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

By प्रकाश गायकर | Published: July 21, 2023 03:07 PM2023-07-21T15:07:49+5:302023-07-21T15:08:15+5:30

खोट्या सीबीआय अधिकाऱ्याने वारंवार भिती घालून ब्लॅकमेल करत पाच लाख ५८ हजार रुपये खंडणी उकळली

The patient will die from the medicine you give Fake CBI officer arrested for extorting extortion | तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

googlenewsNext

पिंपरी : तुम्ही दिलेल्या औषधामुळे रुग्ण मरणार असून स्वत: सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत मेडिकल दुकानदारांकडून वेळोवेळी खंडणी उकळली. आली. याप्रकरणी तोतया सीबीआय अधिकाऱ्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली.

सुरेश जसाराम चौधरी (वय ३२, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मांगीलाल घिसाराम चौधरी (वय ३७, रा. चिंचवड स्टेशन) यांनी याबाबत गुरुवारी (दि. २०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ डिसेंबर २०२२ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत आनंदनगर, चिंचवड येथील भगवती मेडिकल आणि मोशी येथील लक्ष्मी मेडिकल येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश चौधरी याने ओळखपत्र दाखवत सीबीआय असल्याचे सांगितले. तुमच्या मेडिकलमधून दिलेल्या औषधांमुळे पेशंट मरणार आहे. त्याचा गुन्हा दाखल होऊन अटक होणार आहे, अशी भिती घालून वेळोवेळी ब्लॅकमेल करत पाच लाख ५८ हजार रुपये खंडणी उकळली. तसेच शहरातील इतर मेडिकल दुकानदार यांनाही सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांनाही गुन्हा दाखल होणार, तुम्हाला अटक होणार, अशी भिती घालून त्यांचीही फसवणूक केली. याबाबत संबंधित दुकानदाराने खंडणी विरोधी पथकाकडे अर्ज केला होता. त्यानंतर तो दुकानदार गावी गेला होता. यामुळे आरोपीचा माग करून गुन्हा दाखल करण्यास वेळ लागला. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद सावंत यांनी केले आहे.

Web Title: The patient will die from the medicine you give Fake CBI officer arrested for extorting extortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.