Pimpari-Chinchwad Muncipal Corporation: सर्वाधिक लहान प्रभाग ३७ हजार तर सर्वांत मोठा प्रभाग तळवडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 10:47 AM2022-02-01T10:47:48+5:302022-02-01T11:02:28+5:30
महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे
विश्वास मोरे
पिंपरी : महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे. तर १३९ प्रभागात २२ प्रभाग अनुसुचित जातीसाठी आणि ३ प्रभाग अनुसुचित जमातींसाठी आणि ११४ जागा खुल्या गटांसाठी असणार आहे. तीन सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग तळवडे असेल तर चार सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग हा सांगवी असणार आहे. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून शेवटचा प्रभाग हा सांगवी असणार असल्याचे समजते.
पिंपरी - चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक फेब्रुवारीत होणार होती. मात्र, प्रारूप आराखडयासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. तो आराखडा तयार करण्यात आला. २०१७ च्या निवडणूकीत १२८ प्रभाग होते. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढत ती १३९ झाली आहे. मंगळवारी प्रभाग रचनेचा आराखडा जाहिर होणार असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कोणाचा प्रभाग कसा झाला, याबाबत उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला आणि कोणाचा प्रभाग तोडला याबाबत सुरस कथा दोन महिने सुरू होत्या. त्यास पूर्णविराम मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक ३२ प्रभाग हे चार नगरसेवकांचे ह७ोते. तर २०२२ मधील महापालिका निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार असून त्यात ४६ प्रभाग आहेत. महापालिकेतील त्यातील ४५ प्रभाग तीन नगरेसवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाºया खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाला आराखडा सादर केल्यानंतर त्यात वारंवार बदल करण्यात आले.
असे असतील संख्याबळ
अनुक्रमांक, आरक्षण, संख्या
१) अनुसूचित जाती : २२
२) अनुसूचित जमाती : ३
३) खुला : ११४
एकूण : १३९
...........................
असे असते आरक्षण
आरक्षण, टक्केवारी
१) अनुसूचित जाती : १६ टक्के
२) अनुसूचित जमाती : ३ टक्के
३) खुला : ११४
....................
१) लोकसंख्या (२०११) : १७ लाख २७ हजार ६९२
२) अनुसूचित जातीची लोकसंख्या : २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)
३) अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)
अनुसुचित जातीसाठी २२ प्रभाग
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांमध्ये २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ आहेत. अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे.
हे आहेत अनुसूचित जातींसाठी राखीव प्रभाग :
२९,१९,२०,२२,४३,११,३७,१८,२९,३४,१६,३५,१७,४४,३९,३२,४६,४१,१४,२५,३८,३३ हे २२ प्रभाग आहेत.
हे आहेत अनुसूचित जमातीसाठी प्रभाग-
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ५ आणि ६ हे आरक्षित असतील. ते दिघी, भोसरी आणि पिंपळे - गुरव, पिंपरी असे असण्याची शक्यता आहे.
लहान प्रभाग ३२ चा तर मोठा ४० हजार लोकसंख्येचा
प्रारूप आराखड्यात प्रभागाची कमी लोकसंख्या ३२ हजार तर अधिक लोकसंख्या ४० हजार अशी आहे. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्रमांक ३७ ची असून ती ३२ हजार ६६४ अशी आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या तळवडे प्रभाग क्रमांक एकची असून ती ४० हजार ७६७ अशी आहे. तसेच, चार सदस्यीय प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या ४६ हजार ९७९ अशी आहे.