विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 09:06 AM2022-06-24T09:06:11+5:302022-06-24T09:06:35+5:30
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली
पिंपरी : पालखी सोहळ्यात चोऱ्या करणाऱ्या ११ महिलांसह तब्बल ३७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली.
किशोर पुंजाराम जाधव (वय ३३, रा.पाथर्डी, अहमदनगर), ग्यानदेव बाळा गायकवाड (वय ३४, रा.जालना), नितीन अशोक जाधव (वय २५ रा. अक्कलकोट) गणेश जाधव (वय २५, रा सोलापूर) कुणाल बाळु मोरे (वय ३० रा. दिघी), दत्ता श्रीमंत जाधव (वय २४, रा. गांधीनगर झोपडपटटी), प्रशांत विजय गायकवाड (वय २५, रा.बीड), अविनाश भागवत गायकवाड (वय १९, रा. बीड), विजय सर्जेराव पवार (वय ४३, रा. अहमदनगर), आकाश मोहन डुकरे (वय २१, रा. अहमदनगर) बजरंग रघुनाथ पवार, किरण अशोक नेखवाल, विठठल अश्रुबा जाधव, संतोष वसंत गायकवाड, गणेश रामा पिटकर, माधव सखा पवार, ज्ञानेश्वर मधुकरराव जाधव, विजय महींद्रसिंग, राकेश राजू झेंडे, विजय बाळासाहेब गायकवाड, शाम गुणाजी गायकवाड, रायाविठ्ठल बडीदकर, राहुल अशोक गंगावणे, विकास भारत गायकवाड, दामोदरदत्त बबन धोत्रे, सुरज भारत पवार, शांता वसंत गायकवाड, कमल सुरेश जाधव, रेणुका राजू गायकवाड, सारिका भाउसाहेब गायकवाड, हौसाबाई नामदेव कांबळे, कोमल सुनील गायकवाड, सोनी सागर सकट, अंजू कृष्णा उपाध्ये, रंजनी प्यारेलाल कांबळे, सविता महोदव गायकवाड, पंचकुली बाबासाहेब गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात होणाऱ्या चोरी आणि लुटमारीचे प्रकार रोखण्याच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमला होता. दरम्यान दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत चोरट्यांना अटक केली.
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, शंकर बाबर, प्रकाश जाधव यांच्यासह विशेष पथकाने ही कारवाई केली.