पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 01:05 PM2023-03-08T13:05:06+5:302023-03-08T13:05:15+5:30

विधवा हा शब्द काढून पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा ही शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार

The term widow for a woman after the death of her husband is misconstrued; Rupali Chakankar | पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

पतीच्या निधनानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द सर्वार्थाने चुकीचे - रुपाली चाकणकर

googlenewsNext

पिंपरी : पतीचे निधन झाल्यानंतर महिलेसाठी विधवा हा शब्द वापरणे सर्वार्थाने चुकीचे आहे, असे सांगत पूर्णांगी हाच शब्द महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा आहे. यापुढे विधवा हा शब्द काढून टाकून त्याऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा, अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चिंचवड येथे बोलताना दिली.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम, महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला. चिंचवड नाट्यगृहात कार्यक्रम झाला. कवयित्री संगीता झिंजुरके, राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार आकांक्षा पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार अश्विनी जगताप, प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आदी उपस्थित होते. उत्तरार्धात ज्येष्ठ पत्रकार राज काझी यांनी कलावंतांची मुलाखत घेतली. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ शिवले, कार्याध्यक्ष राजू करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या, स्त्रियांचे प्रश्न वषार्नुवर्षे कायम आहेत. समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहे. आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र हुंड्यासाठी आम्ही कर्ज काढतो. शिक्षण आणि तिचे कर्तृत्व ह्याच गोष्टींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही, तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.’’ सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

मालिकांमध्ये महिलांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, महिलाच महिलांचे पाय ओढतात, खच्चीकरण करतात, अशा आशयाचे चित्रण सध्या केले जाते. हे वैयक्तिकरीत्या मला मान्य नाही. कल्पनांचा दुष्काळ पडला की काय अशी शंका वाटू लागली आहे.’’

पर्ण पेठे म्हणाल्या, कलाक्षेत्राची खरी गंमत ही असते की आपण रंगमंचावर काहीतरी करत असतो. दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्यसुद्धा असतं.’’

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही चांगली किंवा वाईट असते असं नाही. टाळी घेतो तेव्हा छान वाटतं, कौतुक केलं की जसं छान वाटतं.’’

Web Title: The term widow for a woman after the death of her husband is misconstrued; Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.