Pimpri Chinchwad Crime: सीसीटीव्हीत चोर दिसला जागेवर येऊन धरला!
By रोशन मोरे | Updated: September 25, 2023 17:45 IST2023-09-25T17:44:08+5:302023-09-25T17:45:32+5:30
ही घटना शनिवारी (दि.२३) बीट्स कंट्रोल ॲण्ड सोल्युशन्स कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली....

Pimpri Chinchwad Crime: सीसीटीव्हीत चोर दिसला जागेवर येऊन धरला!
पिंपरी : कंपनीत चोरी करून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना रंगेहात सुरक्षारक्षकांनी पकडले. त्यातील एक चोरटा सुरक्षारक्षकांच्या हातून निसटला. मात्र, दुसऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.२३) बीट्स कंट्रोल ॲण्ड सोल्युशन्स कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी तीर्थराज सीताराम यादव (वय ५०, रा.भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रवी सुरेश पवार (१९, रा.आदर्शनगर, मोशी) याला अटक केली. तर, संशयित रोहन पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे फिर्यादी यांच्या कंपनीची भिंतीवरून कंपनीच्या आतमध्ये आते. त्यांनी कंपनीतील पाच हजार रुपये किंमतीचे कंपनीतील साहित्य चोरून ते चालले होते. संशयित चोरी करत असताना सुरक्षारक्षकांच्या केबीनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतले. तर, दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. सुरक्षारक्षकांनी संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले. पळून गेलेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.