Pimpri Chinchwad: मालकासमोरच घसरून पडला दुचाकीचोरटा; पोलिसांत नेला!

By रोशन मोरे | Published: September 15, 2023 05:38 PM2023-09-15T17:38:43+5:302023-09-15T17:39:10+5:30

या प्रकरणी आप्पासाहेब माधव महाडिक (वय ३१, रा. दिघी ) यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

The two-wheeler fell in front of the owner; Took to the police pune crime | Pimpri Chinchwad: मालकासमोरच घसरून पडला दुचाकीचोरटा; पोलिसांत नेला!

Pimpri Chinchwad: मालकासमोरच घसरून पडला दुचाकीचोरटा; पोलिसांत नेला!

googlenewsNext

पिंपरी : दुचाकीची चोरी करून ती फिरवत असताना संशयित घसरून पडला आणि थेट दुचाकी मालकालाच सापडला. या संशयिताला दुचाकी मालकाने पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (दि.१४) दत्तनगर टेकडी, दिघी येथे घडली. या प्रकरणी आप्पासाहेब माधव महाडिक (वय ३१, रा. दिघी ) यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित कृष्णा दत्तात्रय म्हेत्रे (रा.भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिस हवालदार सतीश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पासाहेब यांनी दुचाकी दत्तनगर टेकडी येथे पार्क केली होती. मात्र, त्यांनी नंतर येऊन पाहिले असता ती त्यांना दिसून आली नाही. त्यामुळे ते या विषयी फिर्याद देण्यासाठी दिघी पोलिस ठाण्यात गेले.

फिर्याद देऊन परत जात असताना रस्त्यावर एक दुचाकीचालक पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता पडलेली दुचाकी चोरीला गेलेली त्यांचीच असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुचाकीवरून पडलेल्या संशयित कृष्णा याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस संशयित कृष्णा याच्याकडे चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Web Title: The two-wheeler fell in front of the owner; Took to the police pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.