चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:12 IST2018-10-02T15:12:32+5:302018-10-02T15:12:40+5:30
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली.

चिंचवडमध्ये भरदिवसा घरफोेडी,जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली. याप्रकरणी आशा अरुण सावदेकर (वय ५९, रा. जगन्नाथ कॉम्प्लेक्स, जयश्री सिनेमागृहाजवळ, चिंचवड स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावदेकर या जगन्नाथ कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ३३ मध्ये राहतात. सोमवारी दुपारी एक वाजता फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरटा कडीकोयंडा उचकटून घरात शिरला. १ लाख १२ हजार १०० रुपये किंमतीचे सोन्याचे व दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच १५ हजार रुपयांची रोकड हा ऐवज लंपास केला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.